स्फुटास्फुटातुन फुटत राहती अस्फुट कैक फटाके
छिद्रान्वेषी मूढांसाठी फोडित चूक फटाके
सुतळी वर्दी लडी लवंगी सवे सुरुंगी गांजा
पिळुन टाकल्या पोटी उडती भडकुन भूक फटाके
कुटून काथ्या धागे धागे वीज ठासुनी नेत्री
बार उडविती गिरनाराचे गाठुन टूक फटाके
फक्त वाकती नेट फेकण्या खोलीच्या अंदाजे
सर्व जाणते पण फटके मम शिवण्या हूक फटाके
दारूगोळा भुईनळ्यांतुन पाडत ठिणग्या जळती
झरून जाण्या नयनांमधला सल भावूक फटाके
काळ “सुनेत्रा” पंचभूतमय ऐसा दावे इंगा
करी शिशाचे सहाकर्णयुत शर वाळूक फटाके