समुद्र धरती भेट तटावर ठासून दारुगोळा
उसळत लहरी कैक मनावर ठासून दारुगोळा
आज चेन्नई गत मद्रासी जुनी पुराणी भांडी
तोफावाली नाव जलावर ठासून दारुगोळा
उपादान तव आत्मा केवळ हृदयमंदिरी प्रतिमा
निमित्त पात्रे आधारावर ठासून दारुगोळा
कथा जीवनी फुले उमलता कोमल दरवळणारी
फळ मोक्षाचे पण सत्त्यावर ठासून दारुगोळा
दो बाहूंचे यान ठाकले चरणतळी मम भूमी
मुळी न थरथर रोमांचावर ठासून दारुगोळा
मूळ कारणे कोण जाणतो यावे त्याने पुढती
उड्डाणास्तव सती गडावर ठासून दारुगोळा
ठाम “सुनेत्रा” तत्त्वावरती उभी टोक गाठूनी
कुणा न म्हणते सावर आवर ठासून दारुगोळा