जाहले चरबट आच रे कर सोसुनी धग
खले पाथरवट काच रे पर चोरुनी धग
माठ फोडूनी टाकले कचऱ्यात खापर
वळले आचरट जाच रे धर राखुनी धग
तीर कमठा खांद्यावरी घेऊन निघता
दले मारुन कट का चरे शर लाटुनी धग
जीव मी जगवुनी जगे सत्यास स्थापुन
थांबले धुरकट नाच रे हर गर्जुनी धग
“सुनेत्रा” अक्षररंग उधळे वेचुनी क्षण
टाचले गळवट वाच रे भर तोलुनी धग