अहंला झुकावेच लागे अती हाव भरण्या
सुपाऱ्या फटाके फुटोनी नवा गाव भरण्या
मना अंधश्रद्धा किती प्रिय तरीही मला ना
तयांना कुटायास बत्ते खली भाव भरण्या
कशाला करू आत्महत्या असे जैन मी हो
जिवांनी जगावे पुन्हा वाटते घाव भरण्या
खरी संपदा पुण्य माझे अपत्त्ये गुणांची
खुशीने लिहावे नि गावे पुन्हा ताव भरण्या
लगागा लिहू पाचवेळा उगाळून मात्रा
जरी गाल खप्पड मुखावर जरा राव भरण्या
सरे पावसाळा हिवाळा न पाऊस झरतो
सुकी आटलेली भुश्याने तळी बाव भरण्या
मला जाग आली हवेने सुगंधी फुलांच्या
पहाटे सुनेत्रा दवाने भिजुन नाव भरण्या