रसाळ बेट बेरकी इरा गुणानुरागिणी
सुजाण चाट जाहले तऱ्हा गुणानुरागिणी
करात पुष्प मोगरा वळून ताल नर्तनी
न पावलात वक्रता हिरा गुणानुरागिणी
कमाल रोजचीच ही किमान बोलणे जरी
उलून अंकुरा भरे धरा गुणानुरागिणी
रुबाबदार नर्तकी नुपूर वाजती झणी
सहज ध्वजेस पेलते धुरा गुणानुरागिणी
सुशांत समय गारवा हवेत सत्य लहरते
सुवर्ण नीर निर्झरा कऱ्हा गुणानुरागिणी