जसे रत्न कन्या तसे पुत्र सुद्धा
जशी माय कारण तसा बाप सुद्धा
जसा गाळ साठे तसे पात्र बनते
जसा लेक कडवा तशी लेक सुद्धा
जरी कायद्याने तुला हक्क मिळतो
जशी लेक गिळते तसा लेक सुद्धा
जसा हात मारू तसे द्रव्य वाहे
जशी पुण्य धारा तसे नीर सुद्धा
जसा एक आत्मा तसे कैक आत्मे
जशी मी सुनेत्रा तसा अर्थ सुद्धा