ज्ञान दीप अंतरी जोड शब्द अंतरी
ज्ञान दान जे दिले सहज येय मंतरी
भाव अर्घ्य वाहते ओंजळीत द्रव्य हे
ज्ञान आचरण खरे तेच नग्न संत री
री कशास हे पुढे सांगते तुम्हांस मी
ज्ञान आदरे मिळे सांगतात पंत री
दर्शनास मंदिरी शांत उपवनी जिना
ज्ञान योग साधण्या स्तंभ ना हलन्त री
गझल शुद्ध भावना चित्त शांत आत्मिया
ज्ञान स्वाद चाखण्या गा सिद्ध अरिहंत री