आषाढ संपला ना आहे अजून बाकी
येणार श्रावणाची धारा स्मरून बाकी
कोणास वेध लागे गोणी भरावयाचा
करण्या वसूल मरमर ठोके धरून बाकी
अंदाज हावऱ्यांचे भोगात साठलेले
कर्मे कुटील नीती दारी सजून बाकी
निंदा टवाळ खोरी खात्यात परतलेली
चोरी कशाकशाची बघ आठवून बाकी
कल्याण तव कराया बसलेत दोन प्राणी
लावून पाय पळ तू विसरून धून बाकी