आषाढ योग वर्षा मेघांत दूत आहे
क्षितिजावरून येतो जलदांत दूत आहे
काव्यातल्या स्मृतींनी बघ प्रीत रंगलेली
मम प्राण सांगतो मज प्राणांत दूत आहे
नक्षत्र श्रवण आहे पंचांग एक लिहिते
बांधीव सन्मतीच्या अंकांत दूत आहे
गुंफीत अक्षरांचे सूत्रात लक्ष मोती
येई अवस दिव्यांची दीपांत दूत आहे
नुरली मनात शंका शंखास फुंक वाऱ्या
धर ओंजळी सुनेत्रा हातांत दूत आहे