तेरा नि तीन सोळा गाई सुनेत्रा गझल
धरते जमीन ठेका गाई सुनेत्रा गझल
ललबाय रात गाते पाण्यातल्या जीवांस
कलदार स्पर्श झोका गाई सुनेत्रा गझल
कोनात बंद कोणी उघडून घे व्यवहार
जाणून निश्चयाला गाई सुनेत्रा गझल
आता कशास पाहू मागे वळून कोणा
चरणात न्यास बेला गाई सुनेत्रा गझल
प्रीतीत नाव कुठले देऊ “सुनेत्रा” तुला
रत्नत्रयात आत्मा गाई सुनेत्रा गझल