अंगठीतले खडे शोभती
पंचारती काकडे शोभती
जसे शिपाई निळ्या डोंगरी
तसे दुधारी कडे शोभती
हिमालयावर मुनी ध्यानरत
झडे नवल चौघडे शोभती
चरण कमल उमटता वालुकी
विटेवरी कानडे शोभती
जलद “सुनेत्रा” झरुन अंगणी
सुकेशरी दव सडे शोभती
अंगठीतले खडे शोभती
पंचारती काकडे शोभती
जसे शिपाई निळ्या डोंगरी
तसे दुधारी कडे शोभती
हिमालयावर मुनी ध्यानरत
झडे नवल चौघडे शोभती
चरण कमल उमटता वालुकी
विटेवरी कानडे शोभती
जलद “सुनेत्रा” झरुन अंगणी
सुकेशरी दव सडे शोभती