थबकुनी अंदाज घेतो शेर माझा
मोजते आता खुशीने घेर माझा
ऐक आई घागरींचा नाद भूवर
वारियाने संपवीला केर माझा
पुण्यनगरी मावळी शिवसैन्य लढले
ग्राम मोठे देश तो बाणेर माझा
खोदतो भूमी तराई शास्त्र मिळण्या
गुप्ततेने गस्त घालत हेर माझा
वावरे गझली “सुनेत्रा” शुद्ध आतम
ढंग चाळे विकृती ना थेर माझा