रंग फाल्गुनी – RANG FALGUNI


मने हरित जाहली खरी खुलून गावया
वनात बहर लीलया पुन्हा वसंत गावया
रंग फाल्गुनी झरे फुलाफुलांत उतरण्या
सुगंध पाकळ्यांतला हवेत मंद लहरण्या
गात पाखरे झरे मनास नाद मोह तो
पान पान मोहरात आम्रवृक्ष डोलतो
वादनात गायनात सृष्टी रंग दंगली
मने फुलून रंगली… मने फुलून रंगली … .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.