शांत योग्य वेळ ही फिरावयास जायची गायची
कोटरांत पाखरांस ऐकण्यास जायची गायची
एक दोन तीन चार पाच आणखी सहा सात रे
लीलया लगावली लिहून मज पहायची गायची
अंगणात पारिजातकांस हलवण्यास ये वारिया
मुग्ध तरल काळ वेल पर्णभार ल्यायची गायची
भर दुपार प्रहर दोन वाजले किती बरे नेमके
तप्त समय सूर्य पुष्प पीत जर्द व्हायची गायची
अंतरात उतरुनी हव्या तश्या फुलावया भावना
तैलचित्र रेखुनी नवीनता भरायची गायची