मेंदी हीना मद मदरंगी
पंचम काळ सनद मदरंगी
पाटे वरवंटेच जाहले
अंधारात बळद मदरंगी
जीव अता मम शांत जगाया
मनातली खदखद मदरंगी
नीरेवरती धरण डोलते
नळ नेत्रात पुसद मदरंगी
वाटुन पाने तळवे आणिक
तुझे “सुनेत्रा” पद मदरंगी
शब्दार्थ … मदरंगी – मेंदी (वनस्पती)
मेंदी हीना मद मदरंगी
पंचम काळ सनद मदरंगी
पाटे वरवंटेच जाहले
अंधारात बळद मदरंगी
जीव अता मम शांत जगाया
मनातली खदखद मदरंगी
नीरेवरती धरण डोलते
नळ नेत्रात पुसद मदरंगी
वाटुन पाने तळवे आणिक
तुझे “सुनेत्रा” पद मदरंगी
शब्दार्थ … मदरंगी – मेंदी (वनस्पती)