भरुन घागरी ऊन ओतण्या वैशाखी वणवा
ग्रीष्म ऋतूतिल झळाळणारा वैशाखी वणवा
वैशाखतिल पहिला वहिला सण अक्षय तृतिया
अभिषेक जिना इक्षुरसाचा वैशाखी वणवा
प्रवचन वात्सल्याने साधू भिजवण्यास येता
शुभ्र फुलांसम धाडे धारा वैशाखी वणवा
मातेच्या हृदयातिल शक्ती अपत्यांस रक्षे
तिज न थोपवे थंडी गारा वैशाखी वणवा
जिनवाणीचे पान करूनी जीव शांत होई
सांजवात लावता शांत हा वैशाखी वणवा