रमा बाई रान डेरा हिरवा गार गोल फेरा
हिरवा गार गोल फेरा हिरवा गार गोल फेरा
चला जाऊ फिरायाला लोणावळा खंडाळ्यास
विमा माईची तवेरा हिरवा गार गोल फेरा
पाखरांचे गोड गाणे ऐकूनिया छान छानच
चिमा ताई देय शेरा हिरवा गार गोल फेरा
लेकीसुना माहेरात त्यांच्या पीत घागऱ्याचा
सुमा आई मोज घेरा हिरवा गार गोल फेरा
जहाजाला मालवाहू हुशारीने ताब्यात घे
नाकतोड्या गुप्त हेरा हिरवागार गोल फेरा
तिन्ही काटे वाकुनी रे रत्नत्रय घड्याळ झाले
न वाजविण्या तीन तेरा हिरवागार गोल फेरा
सुनेत्राची गझल सुंदर मात्रावृत्त बांधेसूद
कांचपात्री चषक येरा हिरवा गार गोल फेरा