शांत चित्त व्हावयास जपेन अंतरी जिनास
निसर्गात ईश्वरास जपेन अंतरी जिनास
जाप द्यावयास नित्य स्मरेन मूर्त वीतराग
शुद्ध भाव आस ध्यास जपेन अंतरी जिनास
काय वचन आर्जवात जिनालयात आसनात
क्रोध लोभ त्यागण्यास जपेन अंतरी जिनास
अंतरंग मार्दवात धरेन नाम पूज्य सिद्ध
शौच सत्य संयमास जपेन अंतरी जिनास
गोष्ट आगमातली जुळवून ठेवली मनात
सत्य सार जाणण्यास जपेन अंतरी जिनास