बघू कसा करतोस दहावा जिनशासन आहे
मनात फुलला पीत बहावा जिनशासन आहे
अंध रुढींना खाक कराया खडा पहारा हा
बारावा तव करे सहावा जिनशासन आहे
जिनबिंबावर अतूट श्रद्धा त्याला भय कसले
तीर्थंकर अर्थात पहावा जिनशासन आहे
तेराव्याची वाट पहावी भोंदू भक्तांनी
वाट्यावर आलाय अहाहा जिनशासन आहे
जिनानुयायी असे ‘सुनेत्रा’ मानस्तंभ जपण्या
रत्नत्रय धारात नहावा जिनशासन आहे