जाग सख्या पांडुरंगा झुंजूमुंजू झालं
सोनियाच्या रथातून सूर्यदेव आलं
पूर्वदिशी केशरात जगन्नाथ न्हालं …
चैतन्याच्या पावसात देऊळात धावा
पंढरीचा विठुराया भेटायला यावा
थवा पाखरांचा उडत वाळवंटी आला …
प्रभातीच्या किरणात स्नानासाठी आला….
पंढरीची चंद्रभागा भीमा आधी नाव
धुते पाखरांचे पंख पुसे गाव भाव
दर्शनास माऊलीच्या रखुमाई आतुरली…..
धूत पंख लेऊनीया मंदिरी पातली..
मंदिराच्या कळसाला सोन्याचा नारळ
शिवारात ऊस आणि शेजारी गुऱ्हाळ
भजनात गुंग भृंग वाजताती टाळ…..
अंतरीचा वर येई कंठामंदी गाळ.. ..
किती हौशे किती गौशे आले पांडुरंगा…………..
एक देह एक आत्मा नामाचाच दंगा.