वीरबाला रंगली रंगात सुंदर गा
वीर हृदयी पद्म लेश्या सात सुंदर गा
मोगऱ्याचा वेल आई मांडवी गगनी
वीर भारी लेक माझी नात सुंदर गा
ईश्वरी वरदान दंगल भावना जपते
वीर गुंडे लेक माझे जात सुंदर गा
केशरी धाग्यात पुष्पे गुंफली सारी
वीर सैनिक पाच आम्ही हात सुंदर गा
नाव आता ना लिहावे वाटते आहे
वीर मरणाचीच इच्छा आत सुंदर गा
.. …..
गा ल गा गा तीन वेळा संगतीला तू
हीच मम आहे लगावल पात सुंदर गा
सप्त शेरांची सवारी आगगाडी सा
धूर ना ओके अता रे रात सुंदर गा
.