खट्याळ झिपरी पोर बागडे
घरात अवती भवती …
पक्ष्यांच्या पंखांवर बसुनी
उडते अवती भवती…
मजेमजेचे खेळ बेरकी
मुग्ध निरागस भाव …
वृक्षांच्या राईत तिचा हा
निसर्ग सुंदर गाव…
गुणगुणते ती मनात रचते
अर्थपूर्ण गाणे …
वाऱ्यावरुनी वाहत येती
तालांकित तराणे …
सान पोरटी नात गोमटी
खोड्या किती करते ..
स्वतः स्वतःच्या रचून गोष्टी
आम्हाला सांगते …