तू सांडतेस काही
मग चाळतेस काही
बोलायचे तसे ना
पण बोलतेस काही
श्वासातुनी मुक्याने
मज सांगतेस काही
जवळी असून सारे
बघ शोधतेस काही
जमवून चांदण्यांना
ना माळतेस काही
हा क्रम आणि मात्रा
का गाळतेस काही
ओझे न ही ‘सुनेत्रा’
तरि वाहतेस काही
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा.