There is a live relationship between butterflies and flowers. Only the butterflies know the language of flowers.But in some special human beings there is an unknown relationship. If they don’t touch each other, don’t speak with each other, don’t stare at each other they feel love. The wavelength of their breath matches with each other perfectly.
फूलपाखरू फक्त जाणते, बोल फुलांचे नाजुक नाजुक;
दवात भिजल्या मधाळ ओठी, दरवळणारे साजुक साजुक!
स्पर्श न केला नजर भेट ना, शब्द एकही कुणी न वदले;
तरंगलांबी दो श्वासांची, एकच पण मज, ठाऊक ठाऊक!
मम नजरेला मीच शोधते, कुठे हरवली कुठे विसरली?
सापडली तर माळ सख्या तू, तुझ्याच नयनी भावुक भावुक!
करांगुली तव धरता हाती, सशापरी काळिज धडधडले;
लाजाळूसम मिटले जरी मी, तुझ्याचइतुकी उत्सुक उत्सुक!
प्रीत आपुली स्फटिक जलासम, घनाघनातुन बरसे झिमझिम;
आकाशाच्या सहस्त्र नेत्री, ओसंडे बघ कौतुक कौतुक!
मुग्ध प्रीतिचे शिल्प घडविले, नीरवतेने असे ‘सुनेत्रा’;
गाभाऱ्यातिल दीप उजळला, बाकी सारे अंधुक अंधुक!