चषकात टी नशीला बर्फाळ कोल्ड आहे
तुज मद्य वाटले पण हा ताज गोल्ड आहे
घे रेसिपी लिहूनी मी सांगते तशी तू
थांबू नको जराही सय खूप ओल्ड आहे
अक्षर टपोर झरते जणु माळ मोतियांची
हातात झिंगलेला रेनॉल्ड बोल्ड आहे
जालास फाडुनी ज्या ते ठिगळ लावताती
जालावरी महा त्या अमुचाच होल्ड आहे
जाऊ नको तिथे तू करण्यास तो खरेदी
तो माल पोचलेला आधीच सोल्ड आहे
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २४)
लगावली – गागालगा/लगागा गागालगा/लगागा