मिसळ मिसळ तू मिसळ भावना पुदगल शब्दांमधे
भरत भरत तू अर्थ नेमके अनवट शब्दांमधे
घुसळ घुसळ तू साय दह्यातिल लोणी काढायास
तूप कढवुनी ओत त्यास तू कडवट शब्दांमधे
फुलव फुलव तू फुलव मनाला येण्या खुदकन हसू
हनुवटीवरची खळी रुतुदे अडमुठ शब्दांमधे
उडव उडव तू घरभर चेंडू मनात टप्पे मोज
मनातले तेवढेच टप्पे उतरव शब्दांमधे
भरव भरव तू घास खगांना गोष्टी त्यांना सांग
साळीमधले प्रेम सुवासिक उतरव शब्दांमधे
मात्रावृत्त – १६+११= २७ मात्रा