असे मीच माझी गुरू देव आता – ASE MEECH MAAZEE GUROO DEV AATAA


In this Ghazal the poetess says my pure heart is my true bank balance.
असे मीच माझी गुरू देव आता
हृदय शुद्ध माझे खरी ठेव आता

मला मी कळाले पुरे हेच मजला
कशाला दुजांची उठाठेव आता

उन्हाने जळाली तुझी गौर काया
चढे सावलीला फुका चेव आता

कुणाची गझल अन कशाची समीक्षा
कितीक अफवांचे फुटे पेव आता

कशाला हवा तुज शिळा गार मेनू
सुखाने तुझ्या तू घरी जेव आता

वृत्त -ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.