फेसबूकी – FACEBOOKY


In this Ghazal, the poetess describes the behavior of some fake-profile facebook members.

फेक खाते काढुनी ते फेसबूकी हिंडती
मस्त शेरे भागिदारी भांडती अन तंटती

लक्ष कंपू  बोल कट्टे  फेस तोंडा आणिती
देखणे ते फेस बघुनी पण पुन्हा ते गंडती

गा यमाचा गालगागा नारनाना राधिका
कैक मात्रा कैक वृत्ते गझल वेडे धुंडती

हीच माझी ती तुझी रे मालकी ते दावती
त्याच त्या फेसात पुन्हा का पुन्हा ते रंगती

त्यागतो मी फेसबूका रोज खोटे सांगती
नित्य बूके धाडुनी तिज प्रेमरंगी डुंबती

वृत्त –  गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.