लिहू मी कशाने गझल सांग वाऱ्या
किती लेखण्यांची दिसे रांग वाऱ्या
भिजविते धरेला धुवांधार वर्षा
तिला सुकविण्या दे मला थांग वाऱ्या
भल्या तू पहाटे नको शीळ घालू
पुरी जाग येण्या हवी बांग वाऱ्या
प्रकाशात साधू खऱ्या सर्व वेळा
जरी फाटले पूर्ण पंचांग वाऱ्या
निळी लाट वेडी तुझी ती ‘सुनेत्रा’
उसळते जणू प्राशुनी भांग वाऱ्या
वृत्त – ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.