रक्षाबंधन व्रत अमुचे
माता रक्षण व्रत अमुचे
छत्र जपाया वडिलांचे
कुंकुम औक्षण व्रत अमुचे
स्वतःच बांधू करी अता
सम्यक कंकण व्रत अमुचे
घरास खिडक्या दरवाजे
ठेवू अंगण व्रत अमुचे
सुगंध देण्या जगताला
होऊ चंदन व्रत अमुचे
श्वास मोकळा करावया
फुलवू नंदन व्रत अमुचे
नीर सुनेत्रा खळखळण्या
विचार मंथन व्रत अमुचे
मात्रा-चौदा=(आठ+सहा), १४=८+६