This ghazal is written in maatraavrutt. Here radeef is Malaa( मला ) and kaafiyaas are laagel, vaatel, saangel(लागेल, वाटेल, सांगेल) etc.
इतुके रोखुन पुरे पाहणे, नजर तुझी लागेल मला
जरी रांगडी मी वनहरिणी, लाज किती वाटेल मला
रोमांचांनी फुलेल काया, बघता बघता बिंब तुझे
अन हृदयीचा दिडदा दिडदा, मंत्र णमो सांगेल मला
जलवंती मी निर्झरबाला, फुलवंती मी फूल मृदू
बास मासळी तळणे आता, उग्र वास झोंबेल मला
लज्जा-बिज्जा सोड नाटके,जळात चोरुन रूप पहा
स्वरुप तुझ्या प्रतिमेचे नाजुक, जिन दृष्टी दावेल मला
आरसपाणी चारूगात्री, मी सम्राज्ञी गझल गुणी
चक्रव्युहाचे केंद्र भेदण्या, धनुष्य तव शोभेल मला
मात्रावृत्त – १६+१४=३० मात्रा