जाण आता खरी ताणण्याची मजा
ताणता ताणता जाणण्याची मजा
ज्यास कळते पुरी लांबण्याची मजा
त्यास भावे न ती खेचण्याची मजा
ढील आता कशाला हवी रे तुला
घे नभी वावडी काटण्याची मजा
थंड ओठांवरी ठेवुनी ओठ तू
लूट बर्फामधे गोठण्याची मजा
सांग कारे तुला ना कळाली कधी
जिंकुनीही रणी हारण्याची मजा
वृत्त – गा ल गा, गा ल गा, गा ल गा, गा ल गा.