तृणपात्यांची लवलव सळसळ
चिमणपाखरे करिती कलरव
दाणे टिपता चाले पदरव
भ्रमरांचा गुणगुण गुंजारव
जुने तरीही भासे अभिनव
रोमांचित मम अवघे अवयव
अनुभूतीचा अनुभव सुंदर
गझलेचा काव्यातुन उदभव
शब्दांमध्ये मार्दव शैशव
माधुर्यातिल आर्जव लोभस
मात्रावृत्त -१६ मात्रा