घेऊ थोडी – GHEOO THODEE


मुस्तज़ाद गझल
कधीच नाही जरी घेतली      घेऊ थोडी
भरून प्याले तरी झेपली      घेऊ थोडी

दिल्यास तू ज्या जखमा मृगजळ      करिती खळखळ
नाद ऐकुनी नशा पेटली      घेऊ थोडी

करावयाला जशी साठवण      तुझी आठवण
दिव्यात भरता वात तेवली      घेऊ थोडी

पैशांची या मिटण्या चणचण      केली वणवण
थकल्यावरती पाठ टेकली      घेऊ थोडी

उपवासाने गळून गेली      पूजा केली
करुन पारणे आज जेवली      घेऊ थोडी

मुस्तज़ाद ग़ज़ल
अधिक माहिती -मजल दरमजल… माझी ग़ज़ल! पृष्ठ क्र. बारा, तेरा
ग़ज़ल संग्रह – मोगरा, ग़ज़लकार – इलाही जमादार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.