चोखुन चोखुन आंबा खा
चवीत पुरता बुडून जा
आंबा आहे भलता गोड
त्याच्याशी तू नाते जोड
कर योगा अन होना रोड
नाद जीमचा आता सोड
नकोस ठेवू भीड नि भाड
मुजोरड्यांना पाडच पाड
पाण्यामध्ये होडी सोड
पुरव जिवाचे कौतुककोड
होशील आता मालामाल
हंसासम डौलाने चाल
नको घाबरू वळणांना
वळणावरच्या थांब्यांना
हवा कशाला तुज थांबा
तू तर बदामचा आंबा
2 responses to “बदाम आंबा – BADAAM AAMBAA”
छान छान म्याम !
THANK YOU