तू तू यू यू करता करता बोर जाहले बोर
टमटम मध्ये बसून गावे फिरे नाचरा मोर
संत असूनी करतो चोऱ्या चोरांचा बघ शोर
खऱ्याच चोऱ्या करण्या मग तो संत जाहला चोर
कुत्रा घोडा डुक्कर बनतो फक्त पुरवण्या कोड
अश्या अडाण्याच्या हाती तू नको सोपवू पोर
कबूल करुनी चुका स्वतःच्या उतरलात हो खोल
झरझर चढुनी याहो वरती धरून हाती दोर
आत्मपरीक्षण करण्यासाठी ध्यान कराहो ध्यान
लवकर सत्वर धुवाच पापे नको जिवाला घोर
दिवस उजेडी फिरत भामटे जसे माजले टोळ
कैद ‘सुनेत्रा’ त्यांस कराया लाव सुनेत्रा जोर
मात्रावृत्त (८+८+८+३=२७ मात्रा)