लालका गाल हे असे झाले
चुंबिता भाल हे असे झाले
सूर ना लागला लय खरी पण
सोडता ताल हे असे झाले
कारवां चालला दुज्या गावा
उठविता पाल हे असे झाले
स्पर्शिता थरथरे किती काया
आज ना काल हे असे झाले
तिजसवे झिंगले खरे वेडे
पाहुनी चाल हे असे झाले
वृत्त -लज्जिता, मात्रा -१७
लगावली – गा ल गा/गा ल गा/ल गा गा गा