ब्रम्हवादिनी तू जैनांची प्रथम ब्रम्हचारिणी
अग्नीमध्ये तापवून घे कलम ब्रम्हचारिणी
मिळव संपदा मुक्तीसाठी स्वधर्मास जाणुनी
शुभ्र लेउनी वसन दिशांचे तलम ब्रम्हचारिणी
मोक्षप्राप्तिचे शरीर साधन श्रमण संस्कृती म्हणे
जीव जगाया किंचित होना गरम ब्रम्हचारिणी
जरी ठेविले थंड मस्तका हृदय नीर तापते
अशा प्रसंगी ठेव भावना सुगम ब्रम्हचारिणी
रक्षण करण्या दिगंबरांचे सिद्धायनी देवी
जिनानुयायी ब्राम्हसुंदरी प्रशम ब्रम्हचारिणी
गझल मात्रावृत्त – २७ मात्रा