जपण्यासाठी तेलदिवे
मंदिर मातीचेच हवे
जरी भाकऱ्या चौकोनी
भाजायाला गोल तवे
जडव कोंदणी मोती दो
शुभ भावांचे उडव थवे
अभयारण्यी वावरती
गेंडे हत्ती रानगवे
जुने जपोनी जाय पुढे
सुनेत्रातले काव्य नवे
गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)
जपण्यासाठी तेलदिवे
मंदिर मातीचेच हवे
जरी भाकऱ्या चौकोनी
भाजायाला गोल तवे
जडव कोंदणी मोती दो
शुभ भावांचे उडव थवे
अभयारण्यी वावरती
गेंडे हत्ती रानगवे
जुने जपोनी जाय पुढे
सुनेत्रातले काव्य नवे
गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)