मोदकांस दे आसन सुंदर
कारण त्यातिल सारण सुंदर
वर्तमान हा अतीव सुंदर
भूतच होता कारण सुंदर
ग्रंथ समीक्षा ललित कथांची
उघडू त्यांचे बासन सुंदर
माझे पुस्तक प्रसिद्ध जगती
अक्षर अक्षर पावन सुंदर
घर सजण्या मम रम्य भूतली
वृक्षांचे संभारण सुंदर
जागृत चेतन मन वैमानिक
नेणिव दैवी साधन सुंदर
गझल – मात्रावृत्त (मात्रा १६)