राजहंस दो निळे सरोवर
डोंगरमाथ्यावर शिवशंकर
हिरवी हळदी कुंकुमवर्णी
आठवणींची फुले धरेवर
सुंदर गोष्टी ना क्षणभंगुर
अक्षय झरणारे ते निर्झर
खळाळत्या भावना झर्याच्या
तयात हसते निळसर अंबर
काठावरच्या लता वल्लरी
जलात बघती अपुले अंतर
बदके लाटांवरती आरुढ
ओढा जणु भरतीचा सागर
लाटांमधली हवा काढण्या
तुझा सुनेत्रा आहे संगर
गझल मात्रावृत्त – मात्रा १६