सारे नकली नसते सखये वेष्टनातले
काही सुंदर असते सखये वेष्टनातले
वेस्टन आणिक वेष्टन यातील फरक जाणता
निर्मळ अन्तर हसते सखये वेष्टनातले
झाकपाक तू करशिल किती ग उघड पुस्तका
हिरमुसुनी मग बसते सखये वेष्टनातले
अग्नीमध्ये झोकुन देउन झळाळण्याला
कमर स्वतःची कसते सखये वेष्टनातले
पारखून तू हरेक वस्तू धाड वेस्टनी
नाहीतर मग फसते सखये वेष्टनातले
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)