मी आहे जादूई चुंबक
खेचुन घेते सुंदर रंजक
अतीव सुंदर मजला मिळते
झुलावया हृदयाचा लंबक
हृदय प्रीतिने भरून वाहे
पूर्ण उमलला त्यातिल चंपक
प्रीत दिली मी प्रीत मिळविण्या
माझे रक्षक बनले कंटक
रक्षक आता विश्व साजिरे
गंधोदक शिंपाया भंजक
मी आहे जादूई चुंबक
खेचुन घेते सुंदर रंजक
अतीव सुंदर मजला मिळते
झुलावया हृदयाचा लंबक
हृदय प्रीतिने भरून वाहे
पूर्ण उमलला त्यातिल चंपक
प्रीत दिली मी प्रीत मिळविण्या
माझे रक्षक बनले कंटक
रक्षक आता विश्व साजिरे
गंधोदक शिंपाया भंजक