माग..डब्या – MAAG…DABYAA


तीन शेरांचे मुक्तक …
माग यातुनी काढायाला पी जे मनास वाटे ते
माग शोधुनी काढायाला पी जे मनास वाटे ते
चिखलामधले अगणित काटे दंश कराया टपलेले
माग त्यातुनी काढायाला पी जे मनास वाटे ते
भरला प्याला सांडूदे तव भिजण्या सारे शेर तुझे
माग वाचुनी काढायाला पी जे मनास वाटे ते

दोन शेरांचे स्वर काफिया मुक्तक…
एक तुला ही अनेक तोले तोलायाला आण डब्या अन तुले
एक तुला ही अनेक वजने तोलायाला आण डब्या अन तुले
भरून रद्दी पोती खोकी पेट्या अवजड इथे आणिल्या कुणी
एक तुला ही अनेक धोंडे तोलायाला आण डब्या अन तुले
(तुला – तराजू…. एकवचन-तुला, अनेकवचन-तुले)

,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.