किरमिजी (KIRMIJEE)


सृष्टीवरल्या प्रेमाची
गोष्ट मोठ्या गोडीची
कशी सांगू कळेना
पेन्सिल बोथट वळेना
टोक केले भरभर
अक्षरे झरली झरझर
केशरी किरमिजी रंगाची
टपोर सुगंधित अर्थांची
अक्षरे केली गोळा
पाणी आले डोळा
उंच मस्त हवेली
शब्दविटांची बनली
इंद्रधनुच्या रंगांनी
रंगवली मी ढंगानी
बिजलीला ती आवडली
म्हणून ढगातून हसली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.