ब्लॅक – BLACK


कचेरीत फ्लिटविकच्या होता कैद सिरिअस ब्लॅक
कृष्णकला वर्गात कोंदटे रंग कळकट ब्लॅक

हिप्पोग्रिफवर बसून झाला मुक्त काळ कुत्रा
परतुन हॅरी गिळे मृदु चॉकलेट कडवट ब्लॅक

चंदेरी काळवीट उमदा नाम प्रॉन्ग्ज त्याचे
खरा धाडसी आश्रयदाता रात्र अनवट ब्लॅक

हर्माइनी नि हॅरीची ही करामत जादुई
निरोप घेई आनंदाने हात हलवुन ब्लॅक

घटिका गोलावरती घुमवुन काळाला मागे
तृप्त जाहले हिरवे काटे आणि करवत ब्लॅक

गझल मात्रावृत्त (मात्रा २६)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.