पातळ अथवा साडी लुगडे पदर मलमली मायेचा
नऊवार वा सहावार रे पदर मलमली मायेचा
मोरपिसे साडीवरची मम रांगोळीतुन अवतरता
अडखळते अन मी सावरते पदर मलमली मायेचा
ऊनपावसामध्ये घेता शिरी लपेटुन पदराला
सुकती भिजती मोरपिसारे पदर मलमली मायेचा
अलामतीवर डे रे ते ये किनार भगवी नाजुकशी
रदीफ घनसर गडद काफिये पदर मलमली मायेचा
जमीन आई धरा सावळी गझल रक्तिमा निळ्या नभी
मात्रा गण वृत्तातिल मिसरे पदर मलमली मायेचा