घे विश्रांती करे विनंती जलदाला पृथ्वी
घे म्हणते मम माळ कुंतली फुलमाला पृथ्वी
वेषांतर करुनी नित सृष्टी नक्षत्रे उधळी
घेय म्हणे खांद्यावर कम्बल वाऱ्याला पृथ्वी
रत्नकम्बला मी का द्यावे म्हणता शिरोमणी
घे रत्नत्रय म्हणे क्षमावणि इंद्राला पृथ्वी
कशास मस्ती सांग दुजांच्या जीवावर जीवा
घे व्रत सुंदर कानी सांगे जीवाला पृथ्वी
पद्मावती जिनशासन देवी पारसनाथाची
घे वीणा पुस्तक हाती तव वनमाला पृथ्वी
सिद्धायिनी जिनशासन देवी महावीर स्वामी
घे घे धारा माळ जयाची गिरिबाला पृथ्वी
गुंफ सुनेत्रा नेत्र नयाचे मक्त्याच्या शेरी
नीर खळखळा धावूदे निर्झरबाला पृथ्वी