क्लीक – CLICK


कशास करु मी क्लीक कुठेही
छायचित्रे मिळवाया…
प्रसन्न साकी माझ्यावरती
सृष्टी सुंदर दावाया…
.
कशास फोटो पाहू आता
तूच ठाकता पुढ्यात रे…
ओढ निसर्गा तुझीच मजला
तुझ्या मनाचा फोटो दे….

मित्र सखा अन ईश्वर गुरु पण
निसर्ग आहे मनुजाचा …
हवीच साकी जिनवाणी मम
स्फुरण्यासाठी काव्याला …

मला न चिंता भीती कसली
निसर्ग देवा तुझ्यासवे…
अंतरीचा जिनदेव दाखवी
बिंब मनोहर तुझे खरे …

सूर्योदय सूर्यास्त पाहते
रोज तरीपण नवा नवा …
पुनव रातीचा पूर्ण चंद्रमा
अंबरातला शांत दिवा …

दहिवर रानी उषा शिंपते
गहिवर पानांवर दिसतो…
भाव अर्घ्य वाहता निसर्गा
काव्यातून आत्मा हसतो …

चिंब जाहली तिप्प जाहली
अता सुनेत्रा खरी खरी ..
मक्ता माझा शोभून दिसतो …
माझ्या काव्य कलेवरी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.