कोण धुतल्या तांदळासम न्याय करण्या… ये पुढे
बघ मुनी जैनी दिगंबर पाय धरण्या… ये पुढे
गायराने ओरबाडून खावया मलिदा पुरा
वासरासह सोडली तू गाय चरण्या … ये पुढे
आगमे पिंछी कमंडल साधने अन साधना
नयन झरले वचन झरले काय झरण्या … ये पुढे
सांडलेल्या भावनांना ठेव पात्री तपवुनी
आसवांवर साठलेली साय धरण्या … ये पुढे
जोड अंतर भाव जोडुन अंतराशी बोलण्या
मी सुनेत्रा हात देते हाय करण्या … ये पुढे